श्रीनाथ कनिष्ठ महाविद्यालयात ग्राहक जनजागरण अभियान

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : अखिल भारतीय ग्राहक पंचायत पैठण शाखेच्या वतीने श्रीनाथ कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी ग्राहक जनजागरण अभियानाची सुरुवात करण्यात आली. गुरुवारी महाविद्यालयाच्या मुख्य दालनामध्ये स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या अभियानाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी प्रा. संतोष गव्हाणे यांनी ग्राहक हक्क जनजागरण अभियानात विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष तथा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य नानक वेदी यांनी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या ग्राहक तक्रारींसाठीच्या ऑनलाइन पोर्टल व सेवांची माहिती दिली.

तसेच सायबर फसवणूक, ऑनलाइन व्यवहारातील धोके आणि वस्तू खरेदी करताना घ्यावयाची आवश्यक काळजी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ग्राहक पंचायतचे तालुका संघटक विष्णू ढवळे, माजी मुख्याध्यापक जालिंदर फलके यांनी ग्राहक कायदा व ग्राहक चळवळीचे महत्त्व विशद केले.

कार्यक्रमाला प्राचार्य शिवाजीराव पठाडे, विष्णू सोनार, प्रविण गोर्डे, शिवाजी जगताप, पंढरीनाथ फुलझळके, उषा जाधव, प्रा. कैलास शेळके, प्रा. रामदास सानप, प्रा. गणेश गिरजे, प्रा. देविदास पाटील, प्रा. विजय रोडे, प्रा.शिवशंकर गुरलेवाड, योगिता सुपेकर, प्रा. सुनंदा देशमुख, प्रा. बालाजी अनमूलवर, प्रा. बालाजी धनगरे, प्रा. कल्याण खरात, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.